Monday, April 13, 2020

लाईट

''ए मादरचोद! यहाँ लाइट लगाने को बोला था ना!''
डिअोपीचा असिस्टंट लाइटवाल्या मनोजवर मोठ्यानं अोरडला.
''सॉरी सर!'' मनोजनं असिस्टंटच्या डोळ्यात डोळे टाकत एक वाक्य चिकटवून टाकलं.
''भोसडी केऽऽऽ अॉंख किसको दिखाता है बे?'' असिस्टंट त्याच्या अंगावर धावून गेला. बाबूभाई त्यावेळी शेजारी पंचवीस फुटांच्या रॉस्टंपवर उभा राहून फाय-केची लाइट सेट करत होता. त्यानं असिस्टंटच्या पहिल्याच वाक्यासरशी झरझर खाली उतरायला सुरूवात केली होती.
"ए जमाऽऽल! वो देख!" त्यानं उतरता उतरता जमालला आवाज दिला. जमाल रागरंग पाहून मनोजकडे धावला. त्यानं मनोजच्या अंगावर धाऊन येणाऱ्या असिस्टंटला 'दाद, मामा' करत थोपवलं. बाबूभाईने खाली उतरून असिस्टंटला गाठलं.
''सॉरी सर! इसकी तरफ से मै माफी माँगता हूँ.'' बाबूभाई असिस्टंटला म्हणाला.
''तेरी माफी डाल तेरी गांड मे. मुझको ये हरामखोर सेट पे नही चाहिए'' असिस्टंट डोळे मोठे करत म्हणाला.
''सर! काम का बंदा है. थोडा दिमाग खाली गरम रेहता है. उसकी गलती के लिए मै माफी माँग रहा हूँ ना! प्लिऽऽज छोड दो. मै समझाता हूँ ना उसे. प्लिज सर!''
बाबूभाई हात जोडले. मग तो चटकन मागे वळला. आवाज असिस्टंटपेक्षा वर चढवत तो अोरडला.
''ए भोसडी केऽऽऽ, सर से कैसे बात करते है वो समझाऊ क्या तेरे को? चल माफी माँग.''
मनोजने माफी मागितली. असिस्टंटचा आत्मा किंचित शांत झाला. बाबूभाई मनोजच्या जवळ सरकला.
''देख लवडे! यहाँ काम करने आया है ना, काम कर. मुझको झगडा नही मंगता. नही तो 'मै' तेरी गांड पे लाथ मारके निकालेगा तुझे.''
''सॉरी बाबूभाई, पर वो...''
''वो छोड अब, फटाफट उधर लाईट लगा.'' बाबूभाईने मोठ्यानं म्हटलं. तसा मनोजने लाईटचा मोठा स्टँड खांद्यावर तोलला आणि तो चालू लागला.
कुठूनतरी डिअोपीचा आवाज कानी पडला.
''एक अोपल अौर दो लाईट कटर ले के आ!''
लाइटवाल्यांचे हातपाय भरभर हालचाल करु लागले. बाबूभाई हाताखालच्या लोकांना कामाला लावत झाडापलीकडे उभ्या केलेल्या मोठ्या लाईटच्या दिशेने निघाला. जमिनीवरुन वळवळत गेलेल्या काळ्या वायर्स, अधूनमधून कुत्र्याच्या छत्रीसारखे डोकावणारे सॉकेट बॉक्समधून त्याचे पाय सराईतपणे वाट काढत होते. त्याला रिफ्लेक्टर आणि काळ्या लाइट कटर्सच्या मधल्या जागेतून येणारा असोसिएट डिरेक्टर अश्विन दिसला. त्यानं दोन ढांगांत त्याला गाठलं.
''अरे सर, कल का शेड्युल क्या है? आपने बताया नही।''
आश्विन बाबूभाईच्या शब्दांसरशी अडखळला.
''शायद कल शूट नही होगा.''
''अरे अश्विनभाय, ये क्या चल रहा है? पंधरा दिन के शूट मे आठ दिन का गॅप? ये परवडता नही. साला लडकेलोग कचकच करते है. इस फिल्म के लिए मैने दुसरी फिल्म को ना बोल दिया. अौर आप यहाँ गॅप के उपर गॅप दे रहे हो!"
"बाबू, तू मेरा दिमाग मत खा! ये हिरॉईन उस अवॉर्ड फंक्शन मे डान्स करनेवाली है. इसने उसकी रिहर्सल के लिए मेरे कई सारी डेट्स वापस ले ली. मै क्या करु?"
"अरे, तुम असोसिएट हो ना! बोलो ना कुछ..."
"क्या घंटा बोलू मै! उसने कम पैसो मे दो बेड सीन करने को हा बोल के फिल्म साईन की है! प्रोड्युसर ऐसे ही खुश है उसपे. जब वो उसे कुछ नही बोलता तो मै क्या बोलू? शूट खिच रहा है, पर मेरे हात मे कुछ नही. जब वो डेट देगी तभी तो शूट होगा. तुझे नही जमता तो छोड दे. मै दुसरा लाईटवाला देख लेता हूँ."
अश्विन चिडचिड करत निघून गेला.
बाबू झाडाजवळ पोचला. लाईटच्या पॅनेलचं बटण फिरवत लाईटची इंटेन्सिटी कमी-जास्त करू लागला. त्याचा लाईट आजच्या पुरता तरी लागला होता.

No comments:

Post a Comment