Wednesday, May 9, 2018

वण

गर्द काळ्याशार राती
पायरवाची चाहूल
मनध्यान वेधूनीया
समोरी तू अवचित

मन गुंतले भासात
मन सयाची तू रेघ
रंग गंधाचा चितार
किती खरा वाटे मला!

अोथंब चांदण्याचा
डोळीया मंदी दाटलेला
तुझ्या ओढीचा पाझर
चेतून गेलं मन सारं

घुसमटलेला श्वास
अन ताणलेला वेळ
नाही विचारा धरबंध
कुंपण मोडे कडाकडा

मन धावे हे सैराट
डोई काळजी तयाची
त्याचा छोटा अडखळ
जिनगानी भर वण

No comments:

Post a Comment