Tuesday, October 2, 2018

अाम्ही नागडे

अक्षरार्थाने सजलेल्या एखाद्या मन्वराला
जेव्हा नागड्यांकडून लज्जेचे डोस प्यावे लागतात
तेव्हा मूग गिळून बसलेल्या तुमच्या-अामच्या सारख्यांचं नागडंपण
ठळकपणे अधोरेखित होत असतं

अाम्हाला कवितेशी देणं घेणं नसतं
अामचा चित्रांशी संबंध नसतो
झापडांपलिकडे काय घडतय?
याच्याशी अाम्हाला घंटा फरक पडत नसतो
 पण अामच्या स्त्रीबद्दल कुणी काही बोललं
तर अाम्हाला फरक पडतो
त्या स्त्रीला नसेल पडत
तरीही अाम्हाला फरक पडतो
कदाचित तिला मन्वरांचा अर्थ असेल कळत
पण अाम्हाला अधिक कळतो

त्यामुळे मन्वर अाणि त्यांच्या पाठीराख्यांनो
खबरदार जर अामच्या स्त्रीयांबद्दल काही लिहिलं तर!!!
कारण तिला लुटलं, मारलं अाणि जाळलं जाण्यापेक्षाही
हे महाभयंकर अाहे
अाम्ही तेव्हा लपून बसलो असलो तरी
अात्ता सामोरे अाहोत
ही वस्तू अामच्या मालकीची अाहे
त्याच्याशी तुमचा कसलाच संबंध नाही
माणूस म्हणूनसुद्धा नाही!

No comments:

Post a Comment