त्या क्षणांच्या गूढ जगामध्ये
कुठपर्यंत हरवत जाऊ मी?
तिथं गेल्यानंतर येण्याची परवानगी मिळत नाही
माझी मलाच...
आठवणींच्या प्रदेशात मुशाफिरी करता येते. अगदी खुशाल... मनसोक्तपणे...
मनाला विसावा लाभेल म्हणून तिथे येणं होतं. प्रत्यक्षात तो कधीच लाभत नाही. सगळंच फसवं असतं. त्या कुपीत कायमचं कैद झालेलं. कधी जबरदस्तीने, कधी नकळतपणे बाहेर ओढून आणतो आपण आणि चावी देतो त्याला. मग ते घडलं, पाहिलं, अनुभवलं, दिसलं त्याप्रमाणे चालत राहतं. आपल्या मनावर भूतकाळाच्या प्रक्षेप पडत राहतात. काळ्या-पांढ-या सावल्या दिसत राहतात. आपण स्वतःलाच भुल देत राहतो.
मनाच्या भिंतींवर भूतं नाचू लागल्यावर काळ सगळ्यांच्या दुःखाचा गाभण राहतो. त्याचे डोहाळे आपल्याला समजत नाहीत. समजते तर भोवती एवढं दुःख नसतं. त्यापेक्षा वर्तमानात राहिलेलं काय वाईट?
तिथं जाता येतं पण थांबता येत नाही. जगता येत नाही. जगायचंच झालं तर त्याची मोठी किंमत भरावी लागते. ती आपल्याला परवडण्याजोगी नसते. झालेले बदल स्वीकारावेच लागतात. त्यांना मान द्यावा लागतो. त्यांपासून अलिप्तही रहावं लागतं. उलटून गेलेला काळ मागे जाऊन बदलायचा प्रयत्न केला तर गुंतागुंतच अनुभवाला येते.
म्हणूनच वर्तमान बरा. जसा आहे तसा आहे. भविष्यकाळ तर त्याहूनही चांगला. त्याच्याकडून काही अपेक्षा तरी करता येतात...

No comments:
Post a Comment