चला, एकदाचा माझाही blog तयार झाला. पण आत्ता यावर लिहावास काही वाटत नाहीए. एक तर रात्रही खूप झालीये आणि काही सुचतही नाहीए. पण काही दिवसांपूर्वी मी ऑर्कुटच्या प्रोफाईलवर टाकण्यासाठी एक कविता लिहिली होती. ती टाकावी म्हणतो इथे. छान! पहिला दिवस (कि रात्र म्हणू?) माझ्या कवितेचा.
तसा मी काही कवी मनाचा वगैरे नाही. पण प्रोफाईल रिकाम होत. म्हटलं काही तरी टाकू. मग लिहिली. अशीच लिहिली. सुचेल तशी. मग माझी मलाच कमाल वाटली. अरे पठ्ठ्या, कविता तर छान झाली. (आता हि थोडी आत्मस्तुती झाली म्हणा, पण मनापासून मला माझीच कविता आवडली) कवितेतल फारसं काही काळात नसलं तरीही मी चार शब्द खरडल्याचा आनंदच झाला.
चला, कविता लिहितो आणि झोपायला जातो.
प्रवास..... अस्तित्वाचा.....
क्षितिजाच्या पलीकडे लुकलुकणारा एक तारा मला खुणावतोय. त्या ताऱ्याकडे जाणाऱ्या कुणाच्या तरी पाऊलखुणा मला दिसतायत. त्यांना डोळ्यांसमोर ठेवून त्या ताऱ्याच्या दिशेने माझा प्रवास सुरु आहे...
.....ओल्या मातीत हळुवार पावलं उमटतायत.... गार वारा शरीरावरून वाहतोय.... मन मोहरून आलंय. आतून काहीतरी उसळून, धडका मारून बाहेर येण्याचा प्रयत्न करतंय. पण माझी पावलं संथ पडतायत. आता मला त्या क्षितिजापर्यंत पोहोचण्याची अजिबात घाई नाहीये.
मला हा प्रवास अनुभवायचाय... मला खूप काही पहायचं. ते पाहण स्वतःमध्ये झिरपू द्यायचंय. शरीराच्या रोमारोमात भिनू द्यायचंय. जुनी सोडून नवी वल्कल धारण करायचीयत.
... आता मला समृध्द व्हायचं!
हा प्रवास कधीच संपू नये अस वाटतय. त्या पूर्णत्वाला जाण्यापेक्षा त्या पूर्णत्वाकडे चाललेली हि वाटचालच सुखद वाटतेय. काय माहित... या वाटेवर चालता चालताच मी स्वतः एक तारा होऊन जाईन!
या क्षणी मी कुठे आहे कदाचित मला सांगता यायचं नाही. पण एकदम मोकळ वाटतंय. अंधाऱ्या जागेतून स्वच्छ मोकळ्या सूर्यप्रकाशात यावं तसं. ज्या ताऱ्याला डोळ्यांसमोर ठेवून मी चाललो होतो त्याचा प्रकाश आता माझ्या अंतरंगातूनच येताना दिसतोय मला.....
मग मी कधीतरी मागे वळून स्वतःच्याच पाऊलखुणांकडे पाहीन. दूरवरून कोणीतरी त्या पाऊलखुणांवरून चालत येत असेल. संथ पावलं टाकत. कदाचित आणखी एक तारा होण्यासाठी.................
तसा मी काही कवी मनाचा वगैरे नाही. पण प्रोफाईल रिकाम होत. म्हटलं काही तरी टाकू. मग लिहिली. अशीच लिहिली. सुचेल तशी. मग माझी मलाच कमाल वाटली. अरे पठ्ठ्या, कविता तर छान झाली. (आता हि थोडी आत्मस्तुती झाली म्हणा, पण मनापासून मला माझीच कविता आवडली) कवितेतल फारसं काही काळात नसलं तरीही मी चार शब्द खरडल्याचा आनंदच झाला.
चला, कविता लिहितो आणि झोपायला जातो.
प्रवास..... अस्तित्वाचा.....
क्षितिजाच्या पलीकडे लुकलुकणारा एक तारा मला खुणावतोय. त्या ताऱ्याकडे जाणाऱ्या कुणाच्या तरी पाऊलखुणा मला दिसतायत. त्यांना डोळ्यांसमोर ठेवून त्या ताऱ्याच्या दिशेने माझा प्रवास सुरु आहे........ओल्या मातीत हळुवार पावलं उमटतायत.... गार वारा शरीरावरून वाहतोय.... मन मोहरून आलंय. आतून काहीतरी उसळून, धडका मारून बाहेर येण्याचा प्रयत्न करतंय. पण माझी पावलं संथ पडतायत. आता मला त्या क्षितिजापर्यंत पोहोचण्याची अजिबात घाई नाहीये.
मला हा प्रवास अनुभवायचाय... मला खूप काही पहायचं. ते पाहण स्वतःमध्ये झिरपू द्यायचंय. शरीराच्या रोमारोमात भिनू द्यायचंय. जुनी सोडून नवी वल्कल धारण करायचीयत.
... आता मला समृध्द व्हायचं!
हा प्रवास कधीच संपू नये अस वाटतय. त्या पूर्णत्वाला जाण्यापेक्षा त्या पूर्णत्वाकडे चाललेली हि वाटचालच सुखद वाटतेय. काय माहित... या वाटेवर चालता चालताच मी स्वतः एक तारा होऊन जाईन!
या क्षणी मी कुठे आहे कदाचित मला सांगता यायचं नाही. पण एकदम मोकळ वाटतंय. अंधाऱ्या जागेतून स्वच्छ मोकळ्या सूर्यप्रकाशात यावं तसं. ज्या ताऱ्याला डोळ्यांसमोर ठेवून मी चाललो होतो त्याचा प्रकाश आता माझ्या अंतरंगातूनच येताना दिसतोय मला.....
मग मी कधीतरी मागे वळून स्वतःच्याच पाऊलखुणांकडे पाहीन. दूरवरून कोणीतरी त्या पाऊलखुणांवरून चालत येत असेल. संथ पावलं टाकत. कदाचित आणखी एक तारा होण्यासाठी.................
Khup Sundar aahe. kavita mala faar kalat nastil pan tyaamaagchya bhavana, tyaacha ugam, prerna ya goshti kavitetun jaanavlyaa ki kavita samajli as mhanata yeil na? Tujhya Blogvarchya pahilyaa kavitesaathi abhinandan!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
ReplyDelete-Sapana
khup chhan ahe...kavi manacha asne nasane mhtwache nahi vyakt hone mhtwache...
ReplyDelete