नितळ चांदण्या खुडल्या तरी चालतील एकवेळ
पण तण माजलेलं रान साफ करायला हात धजावत नाहीत
आमच्या अस्तित्वाचे भार नेहमीच नको त्या खांबांवर तोललेले
आम्हाला त्यावर सुंदर राजमहाल बांधणं कधीच जमत नाही,
पण खांबांचे ते भग्नावशेष सोडवतही नाहीत
आमचं मन दुतोंडी मांडूळासारखं सतत वळवळत राहतं
नव्यानं उमलणाऱ्या नितळ चांदणीला डसण्यासाठी

No comments:
Post a Comment