माणसाला माणूस म्हणून समजून घेणं खरंच एवढं अवघड असतं का?राग, लोभ, वर्चस्वाची आपणच चढवलेली आवरणं गळून पडायला अजून किती वेळ लागावा?
पिंज-यात कोंडून ठेवलेले पंख झुरत रहातात आणि गजांचा माज उतरता उतरत नाही.
झाड कोमेजून गेल्यावर पाणी न घातल्याची हळहळ का बरं करावी?
जगण्यातले बंध तोडायला गेलो तर क्रूरपणे मला त्यात आणखीनच अडकवत जातात. हळूवारपणे सोडवायला गेलो तर पायात घुटमळत रहातात.
क्षणाक्षणाला होणारी नुसतीच पानगळ... अन् लांब पसरलेल्या वाटेवर पालवीचा मागमुसही नाही...
No comments:
Post a Comment